तालुका प्रतिनिधी – समीर बल्की
चिमूर :- चिमूर तालुक्यातील नेरी,शिवणपायली जवळ असलेल्या चिखली परीसरात अवैधरित्या रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार वाहतूक सुरु असतांना रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर च्या ट्रॉली वरून उसरून चाकाखाली दबुन मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून याची माहिती गावाकऱ्यांना मिळताच क्षणी घटनास्थळ गाठून मृतक मजुरास उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.मृतक मुलाचे नाव लखन अंबादास पोईनकर वय १९ वर्षे राहणार शिवणपायली असे आहे.हि घटना पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास घडली आहे.उपजिल्हा रुग्णालयात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर जमली आहे. तर घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.
आणखी किती जिव घेणार नागरिकांमध्ये चर्चेचा विषय
रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर मुळे ड्रायव्हर मजूर हमाल आणि नागरिकांच्या सुद्धा चिमूर तालुक्यात जीव गेलेला आहे.
विना नंबरची ट्रॉली ट्रॅक्टर बिनधास्त पणे रेती वाहतूक करतात मात्र याकडे मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस प्रशासक जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
Discussion about this post