प्रतिनिधी.जयेश राऊत सारथी महाराष्ट्राचा
दिवाळी बारशी सन संपल्यावर ग्रामीण भागात लगबग सुरु होते.म्हणजे गावाचा पारंपारी गावदेवी कार्यक्रम, या कार्यक्रमाला गावात अन्य साधारण महत्व असते गावदेवी कार्यक्रम झाल्याशिवाय शेता मधले नवीन पिक तूर,चवळी, उडीद या पिकाचे भोजन करत नाही.गावामधले सर्व एकत्र जमून रात्रभर देवाची पूजा केली जाते.गावदेवी यासारख्या देवी देवतला प्रत्येक वर्षाला (डाक. डमरू)वाजून अभिवादन केले जाते.गावामधले पुंजारी त्या देवासमोर वारे घेतात .नैवैदे दाखवतात.पुंजारी प्रत्येक देवांची कथा सांगून रात्रभर जागरण करतात.ही परंपरा पूर्वजापासून आहे.गावाच्या विकासासाठी गावदेवी कार्यक्रमांच्या दुसऱ्या दिवशी गावातील नागरिक एकत्र बसून गावाच्या विकासावर चर्चा करतात. आणी त्यानंतर सगळे ग्रामस्थ पगतीला बसून महाप्रसादाचा लाभ घेतात.आणी ग्रामस्थ आपापल्या घरी परतात.प्रत्येक वर्षानंतर गावदेवीचा कार्यक्रम होत.असतो.गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा उत्सव आहे.
Discussion about this post