वाल्मिक कराडच्या मुलगा सुशील कराड व त्याचे दोन मित्र अनिल रावसाहेब मुंडे व गोपी गंजेवार यांनी वाल्मिक कराडच्या मॅनेजरच्या घरात घुसून अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली व तिचा विनयभंग करून लैंगिक छळ केला आहे.
या नराधमांवर पोस्को (कलम 8 व 12) अंतर्गत गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते. परंतु, वाल्मिकी कराडच्या दहशतीमुळे व राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनी पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात फिर्याद दाखल करून घेतली नाही. त्यामुळे पीडितेने BNNS चे कलम १७५/५ नुसार सोलापूर जिल्हा न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीने IPC चे कलम 307, 326, 329, 354, 364, 379, 392, 452, 506, 511 सह 34 आणि पोक्सोचे कलम ८ व १२ नुसार सुशील वाल्मिक कराड व अन्य २ यांचे विरूध्द कोर्टात गुन्हा दाखल केला आहे.
वाल्मिकी कराडच्या मुलांच्या सोलापूर कोर्टात वाऱ्या चालू झाल्या आहेत. या खाजगी गुन्ह्यात BNSS च्या नवीन कायद्यानुसार आरोपींचे म्हणणे घेणेसाठी समन्स जारी झाले असून पुढील तारीख उद्याच म्हणजे दिनांक १८ डिसेंबर २०२४
Discussion about this post