राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष माजी समाजकल्याण मंत्री मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या आदेशानुसार आज सोमवार दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी पलूस तहसिलदार यांना निवेदन देऊन परभणीत घडलेल्या संविधान अवमान प्रकरणी निषेध नोंदविण्यात आला दिनांक 10/12/2024 रोजी परभणी जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोरील चौकात संविधान प्रतिकृतीची माथेफिरूने अवहेलना केली
तरी आपण या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्वरीत चौकशी लावावी व यामागील खर्या सुत्रधाराला अटक करण्याबाबत आपला अहवाल शासनाला पाठवावा.
पोलीस निरिक्षक घोरबांड यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करून मारहाणीत पोलिस कोठडीमध्ये मरण पावलेल्या आंदोलक श्रीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवून त्याच्या विरोधात अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन, व देशद्रोही गुन्हा दाखल करावा “”रक्षक कायदाच भक्षक”” बनत असेल तर या विषयावर आम्हाला आंदोलन उभे करण्याशिवाय पर्याय नसेल.अशी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अशा विकृत प्रकाराचा जाहीर निषेध करून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय मा.बबनरावजी घोलप नाना यांच्या मार्गदर्शनाखाली पछ्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र सनके यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय पलुस येथे नायब तहसीलदार अस्मा जमादार यांना निवेदन देण्यात आले या वेळी आर पि.आए.गटाचे युवक तालुका अध्यक्ष अविराज काळीबाग,भिमसैनिक सागर कांबळे,शितल (मामा) मोरे,उपाध्यक्ष यश आयवळे,भाजपा अनुसुचित तालुका उपाध्यक्ष सुशांत सावंत,मि वडार महाराष्ट्राचा संघटना पदाधिकारी हरिष वडार, किशोर धडे,विवेक होवाळ,अनुराग होवाळ, तसेच महासंघाचे चर्मकार समाज बांधव यांच्या सह राष्टीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post