ठाकरे व धोटे यांची नावे आघाडीवर
मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रहितासाठी तळमळ असणारे भाजपाचे जेष्ठ पदाधिकारी महादेवराव ठाकरे व माजी प. स. सदस्य प्रविण धोटे यांच्या नावाची चर्चा तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.
जेष्ठ पदाधिकारी महादेवराव ठाकरे हे मागील ४५ वर्षांपासून व प्रविण धोटे हे मागील १५ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीत काम करत आहे. मानोरा भाजप चे शहर अध्यक्ष हे पण कट्टर सर्मथक म्हणुन ओळखले जातात मागील दहा वर्षांपासून अध्यक्ष असलेले दिवंगत आमदार राजेंद्र पाटणी यांचे खंदे समर्थक तत्कालीन तालुका अध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण यांनी विधानसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे काम केल्याने त्यांना अध्यक्ष पदावरून भाजपाने निष्कासित केले आहे. त्यांच्या जागेवर भाजपाचा तालुका अध्यक्ष पदावर विराजमान होण्यासाठी मानोरा शहर अध्यक्ष राजुभाऊ देशमुख यांची पण दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे तसेच विठोली येथिल स्वपनिल पाटील भाजपचे युवा कार्यकर्ते यांचे नाव पण चर्चेत आहे तालुका अध्यक्ष पदासाठी डझनभर कार्यकर्ते इच्छूक आहे. या सर्वापैकी विधानसभा निवडणूकीत प्रदेश पदाधिकारी राजू पाटील राजे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्विय सहाय्यक यांची भेट घेत तालुका अध्यक्ष पदासाठी अनेकांनी फिल्डीग लावणे सुरू केले आहे. नुकत्याच काही महिन्यापूर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार सईताई डहाके हया बहुमताने निवडून आल्या आहेत. त्यामुळे मानोरा तालुक्यात भारतीय जनता पार्टीत राजकीय व सहकार क्षेत्रात पकड असलेल्या निष्ठावंत हिंदुत्ववादी विचार असलेले ठाकरे व धोटे यांची भाजपा तालुका पदासाठी नाव आघाडीवर असल्याची चर्चा कार्यकर्त्यात सुरू आहे.



बॉक्स ……
मानोरा येथिल भाजप चे तालुका अध्यक्ष पद हे काही लोकांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातुन काढलेले आहे मानोरा येथिल नविन तालुका अध्यक्ष निवडीकरीता वरीष्ट पातळीवर चर्चा करुन पक्षाकडुन आदेश येईल तेव्हा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल हा निर्णय लवकर घेवू पक्षनिष्टा व सामाजीक कार्य लक्षात घेवून योग्य व्यक्तीला पक्षाचे ईमानदारी ने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देवू
राजु पाटिल राजे
कार्यकारी जिल्हाअध्यक्ष भाजपा वाशिम
Discussion about this post