
नागपूरहुन गाठले नाशिक : मंत्रिपद नाकारल्याने आदळ-आपट सुरुच.
मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नऊ जणांना संधी दिली. यामध्ये दिलीप बळसे पाटील, छगन भुजबळ यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली नाही. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेच्या ऑफरवर देखील छगन भुजबळ यांनी नाकारली आहे. मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळांची आदळआपट सुरुच आहे. श्री. भुजबळ म्हणाले की, सात- आठ दिवसांपूर्वी तुम्ही राज्यसभेवर जा असे सांगितले. मात्र, मला काही दिवसांपूर्वी राज्यसभेवर जायचे होते. सातारला जी जागा होती,
तेव्हा ती जागा दिली नव्हती. मला त्यावेळी सांगितले की तुम्हाला येवल्यातून लढले पाहिजे, असे सांगितले. तुम्ही लढाईत असला तर पार्टी जोमाने पुढे जाईल असे सांगितले गेले. माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादने निवडून देखील आलो, राज्यसभेवर ताबडतोब जाऊ शकत नाही. माझ्या मतदारसंघाच्या मतदारांबरोबर ती प्रतारणा ठरेल. येवल्याच्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. राज्यसभेवर जायचे तर विधानसभेचा ताबडतोब राजीनामा द्यावा लागेल. ते माझ्या लोकांना दुःखदायक आहे. येवल्याच्या मतदारांशी प्रतारणा करु शकत नाही. मला ज्यांनी जे प्रेम दिले त्यांच्याशी प्रतारणा करणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.
मी लढा देतच राहणार..!
ओबीसींच्या संरक्षणासाठी मैदानात आलो होतो, घर दार जाळायला सुरुवात झाल्यानंतर मागासवर्गीयांच्या संरक्षणासाठी उभा राहिलो. त्यावेळी अगोदर राजीनामा दिला होता. मी आता लढणार आहे, असे सांगितले. जे चुकीचे आहेत त्यांच्यासोबत लढणार आहे. सभागृहात दोन्ही बाजूचे लोक माझ्या अंगावर येत असताना कायद्याची बाजू घेत, निकालांचा दाखला देत बाजू मांडली. महायुतीला ओबीसी आणि लाडक्या बहिणी- चा फायदा झाला, असे छगन भुजबड म्हणाले होते..
Discussion about this post