सांगली जिल्हा शहर काँग्रेस ओबीसी विभागातर्फे विविध मागण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस ओबीसी विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष अशोक सिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हणले आहे कि सध्या न्याय प्रविष्ट असणारा ओबोसी आरक्षणाचा मुद्दा सरकारने काळजीपूर्वक सोडवावा. तसेच आगामी येणाऱ्या निवडणुका यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थां, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत यादी ओबीसी आरक्षणासह घेण्यात याव्यात यामध्ये ओबीसी वर्गाचा न्याय हक्कांपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात यावी. आणि आगामी काळातील सर्व निवडणुका या EVM मशीन वरती न घेता त्या बॅलेट पेपर वर घ्याव्यात. याप्रसंगी काँग्रेस ओबोसी विभागाचे प्रदेश सहसचिव दीपक गायकवाड ग्रामीण जिल्हाध्यक्ष अप्पा खोत जिल्हा सरचिटणीस अरुण गवंडी, सेवा दलाचे जिल्हा अध्यक्ष अजित ढोले, यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post