नांदेड दि. 12 -(प्रतिनिधी)
ते नियमबाह्य अतिक्रमण महसूल प्रशासनाने तात्काळ हटवून स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम करावी, अन्यथा स्मशानभूमीत मसनवटा मुक्ती आंदोलन करण्यात येईल, असा इशारा 9 डिसेंबर रोजी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन व मागासवर्गीय ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकारी मुखेड यांना दिला आहे.
मौ. वसूर ता.मुखेड येथील शेत खाते क्र.287 व गट क्र.3,4,5 मध्ये सातबारा नोंदीनुसार मागासवर्गीय समाजाकरिता निर्धारीत केलेल्या स्मशानभूमीच्या एकूण 6 गुंठे जमिनीवर लगतच्या शेतकर्यांनी नियमबाह्य अतिक्रमण केले आहे. ते नियमबाह्य अतिक्रमण हटविण्यात यावे व नियोजित स्मशानभूमीच्या जमिनीची हद्द कायम करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील मागासवर्गीय समाज बांधवांनी तहसीलदार मुखेड, निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड व संबंधित प्रशासन अधिकार्यांना निवेदने दिली आहेत. त्यास अनुसरून महेश वडदकर यांना दिलेल्या निवेदनाचे संदर्भिय पत्र क्र. 2024/ मशाका-2 ज.टे-5/कावि दि.11 जुलै 2024, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दि. 14 सप्टेंबर 2024 व दि.14 ऑक्टोबर 2024 रोजी तहसीलदार मुखेड यांना दिलेले पत्र महसूल प्रशासनास प्राप्त झालेले आहे, यावरुन तहसीलदार तहसील कार्यालय मुखेड यांनी वादातीत जागेच्या स्थळ पाहणीसाठी मंडळ अधिकारी जाहूर ता. मुखेड यांच्या नावे कार्यालयीन आदेश पत्र जा.क्र. 2024/जमा-2/साधाकुळ / कापी दि.1 ऑक्टोबर 2024 रोजी काढले. यास अनुसरून मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन रितसर पंचनामा केला व तो अहवाल दि. 21 ऑक्टोबर 2024 रोजी तहसील कार्यालय प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे.
सर्वसाधारणपणे तालुका असो किंवा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमी व रस्त्याच्या जागेच्या अत्यावश्यक आणि गंभीर समस्येकडे शासन, प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी हे गांभीर्याने तथा प्रामाणिक लक्ष देत नाहीत. हेतूपुरस्सर कानाडोळा केला जातो आणि मौ. वसूर ता. मुखेड येथील मागासवर्गीयांच्या स्मशानभूमीच्या जागे संबंधित नियमबाह्य अतिक्रमण हटविण्याबाबतही असेच झाले आहे. मंडळ अधिकारी यांनी वादातीत जागेची स्थळ पाहणी करुन सत्य अहवाल सादर केलेला असतानाही तहसील प्रशासन ते नियमबाह्य अतिक्रमण हटवून स्मशानभूमीच्या जागेची हद्द कायम करुन देण्यासाठी उदासिन आहे. म्हणून ती जागा बळकावणार्या विरुद्ध योग्य ती कारवाई करुन नियमबाह्य अतिक्रमण तात्काळ हटवून स्मशानभूमीची जागा कायम करावी, या मागणीसाठी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे यांच्या नेतृत्वाखाली मौ. वसूर येथील मागासवर्गीय ग्रामस्थांनी 9 डिसेंबर रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी मुखेड यांना निवेदन दिले आहे. तसेच ते नियमबाह्य अतिक्रमण डिसेंबर 2024 अखेर पर्यंत तात्काळ हटविण्यात आले नाही तर येत्या जानेवारी 2025 महिन्यात स्मशानभूमीत मसनवटा मुक्ती आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन दिलेल्या शिष्टमंडळात सतीश कावडे, सरपंच रमेश पाटील शिंदे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकट लोहबंदे, यादव कवडीकर, गणपत कावडे, व्यंकट घाटे, अचित घाटे, निवृत्ती कावडे, रामराव कावडे, समृत कावडे, झरीबा कावडे, अनिल कावडे, नागनाथ कावडे, धोंडीबा कावडे, इंद्रजित कावडे, अरविंद शिंदे, रमेश शिंदे, उत्तम शिंदे, पंढरी शिंदे, भीमा शिंदे, सुदाम शिंदे, पप्पू कावडे, श्रीपती कावडे, प्रकाश कावडे, यशवंत शिंदे, बाबू शिंदे यांसह मौ. वसूर येथील मागासवर्गीय समाजातील बहुसंख्य नागरिकांचा समावेश होता.
Discussion about this post