प्रतिनिधी :- सतिश नेवारे
गोंडपिपरी :– महात्मा गांधींनी समाजातील लोकांना स्वच्छता राखण्याचे शिक्षण देऊन राष्ट्राला उत्कृष्ट संदेश दिला. त्यांनी “स्वच्छ भारत” चे स्वप्न पाहिले. ज्याच्यासाठी भारतातील सर्व नागरिकांनी देश स्वच्छ करण्यासाठी एकत्र काम करावे अशी त्यांची इच्छा होती. महात्मा गांधीचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑक्टोंबर २०१४ रोजी स्वच्छ भारत अभियान सुरू केले.आणि त्यांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भारतातील सर्व नागरिकांना या अभियानात सामील होण्याचे आवाहन केले. या मोहिमेचे उद्दिष्ट पुढील पाच वर्षात स्वच्छ भारताचे उद्दिष्ट साध्य करणे हा आहे.
जेणेकरून बापूची १५० वी जयंती ही उद्दिष्टाची सिद्धी म्हणून साजरी करता येईल. स्वच्छ भारत अभियान लोकांना स्वच्छतेसाठी दरवर्षी १०० तास कामदाम करण्यास प्रवृत्त करते. स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकार द्वारे चालवले जाणारे सर्वात महत्त्वाचे अभियान आहे.
मात्र या गोष्टीचा नगरपंचायतीला विसर पडल्याचे दिसते. ” खिशात कडसा आणि गावाला वडसा अशी गत नगर पंचायततिची झाली आहे.या कार्यालयाला पान टपरी चाय आणि नाश्त्याचे दुकाने आहेत. म्हणून या ठिकाणी खरा आणि चाय शौकिनांची रेलचेल असते.हे सगळेच आपल्याच कामाशी लेने देणे ठेवतात मात्र समोर साचून असलेल्या कचऱ्याकडे कोणाचेही लक्ष नाही.खरे तर नगर पंचायतीने याकडे लक्ष द्यायला हवे होते परंतु त्यांचेही याकडे काना डोळा होत आहे.
काही दिवसा आधी नगर प्रशासनाकडून पथ विक्रेत्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते. त्या डस्टबिन चे काय झाले ? एकाही दुकानासमोर डस्टबिन ठेवल्याचे दिसत नाही. याचाच अर्थ नगरपंचायत निवड योजना राबविते मात्र त्याचे काटेकोरपणे पालन व्हावे अशी अंमलबजावणी करत नाही हे यावरून सिद्ध होते. म्हणूनच नगरपंचायत परिसरात गलिच्छ प्रकार वाढत चालला आहे.
आपल्या जवळील परिसरच स्वच्छ नाही मग शहर कसे स्वच्छ आणि सुंदर राहणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Discussion about this post