शहर प्रतिनिधी
अझहर पठाण
कळंब : शिराढोण :- अल्पसंख्याक हक्क दिनाचे औचित्य साधून अल्पसंख्याक विकास महासंघ शिराढोणच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा दै बंधुप्रेमचे पत्रकार बिलाल अब्दुल रहमान कुरेशी यांना यावर्षीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला,
बिलाल कुरेशी हे अल्पसंख्याकांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत,सरकारी योजनांची माहिती प्रसारित करुन मुस्लिम समाज बांधवच नाही तर इतर समाज बांधवांसाठी समाजहित कार्य करतात, त्यांना मिळालेला पुरस्कार हा त्यांच्या सामाजिक कामाची पावती आहे व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी अल्पसंख्याक विकास महासंघाचे आभार मानले, त्यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.यावेळी अल्पसंख्याक विकास महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रफीक कुरेशी सह इतर उपस्थित होते.
Discussion about this post