भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम.
सातत्याने संघर्षमय जीवन जगणाऱ्या धनगर समाजाची आता राजकीय नेतृत्वा कडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे असे प्रतिपादन धनगर समाजातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी आपल्या मुंबई येथील एका मुलाखतीत सांगितले.ते पुढे म्हणाले,” सध्याचे राजकीय वातावरण पाहता धनगर समाजाला पोषक असेच आहे, धनगर समाजाचे सहा आमदार विधानसभेत निवडून आले,तर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज प्रा.राम शिंदे हे विधान परिषदेच्या सभापती पदावर विराजमान झाले.
ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.तर दत्तात्रय भरणे मामा यांना कॅबिनेट मंत्री झाले,जत विधानसभा मधून चाळीस हजार मतांनी निवडून आलेले समाजाचे वक्तृत्व संपन्न, नेतृत्व संपन्न, असलेले गोपीचंद पडळकर निवडून आले.समाज गोपीचंद पडळकर यांचे कडे मोठ्या अपेक्षाने पाहतो आहे.सांगोल्यातून डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी ही आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्धी चा पराभव करून आमदार झाले.इंदापूर येथून दत्तात्रय भरणे मामा ही नुकतेच कॅबिनेट मंत्री झाले.माळशिरस चे उत्तमराव जानकर शांत, संयमी व्यक्ती मत्व निवडून आले.
फलटण मधून सचीन कांबळे तर करमाळा येथून नारायण आबा पाटील विधानसभेत निवडून आले.कर्जत जामखेड मधून प्रा.राम शिंदे यांचा निसटता पराभव झाला असला तरी विधान परिषदेच्या सभापती पदावर ते बिन विरोध निवडून आले आहेत.पूर्वी धनगर समाजाचे राजकीय नेतृत्व नसल्यामुळे समाजाच्या समस्या विधानसभेत कोण प्रश्न मांडणार? पण आता मात्र समाजाचे सहा वाघ विधानसभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत.
समाज या सहा वाघाकडे मोठ्या आशेने पाहत आहे.यांनी समाजाचा आपेक्षा भंग करता कामा नये.समाजाला ७० वर्षांपासून एसटी आरक्षण अमंलबजावणी पासून वंचित ठेवले आहे.संविधान समाविष्ट एसटी आरक्षण अमंलबजावणी झाली नसल्याने धनगर समाजाच्या दोन पिढ्या आरक्षणा विना वंचित राहिल्या.भटकणारा, विखुरलेला, शिक्षित झालेला धनगर समाज आता नक्कीच जागृत झाला आहे.आपल्या आस्तित्वाची त्याला पूर्ण जाणीव झाली आहे.संघर्षाची सवय असणाऱ्या धनगर समाजाला थोडी थोडी राजकीय नेतृत्वाची गोडी लागलेली आहे.भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाचे आणखी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील व समाजाला न्याय मिळवून देतील अशी माफक अपेक्षा धनगर समाज बांधवांनी ठेवायला हरकत नाही.
Discussion about this post