सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात खुलताबाद तालुक्यातील खिर्डी येथील रहिवासी विराज हिवार्डे या तरुणाचा मृत्यू झाला. विराज हिवार्डे हा गुरुवारी सायंकाळी उशिरा मोटारसायकलवरून सुलतानपूरकडून खिर्डी गावाकडे येत होता. तर याच मार्गावरून शेताला पाणी भरून पती-पत्नी अन्य मोटारसायकलवरून सुलतानपूरकडून येसगावकडे जात होते. या दोन्ही दुचाकीस्वारांना अंदाज न आल्याने सुलतानपूर बसस्टॅण्डसमोर दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. यात विराज गंभीर जखमी झाला तर दुसऱ्या दुचाकीवरील पती-पत्नीही जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी काहींनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका बोलावून जखमी विराजला तातडीने फुलंब्री रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. विराज खुलताबाद येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा तालुका समन्वयक म्हणून काम कार्यरत होता. तालुक्यातील शेतकऱ्यांना या कामी त्याची मोठी मदत होत होती.
Discussion about this post