सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी ( रजि. ट्रस्ट ) संस्थेच्या प्रेरणेने आयोजित राज्यस्तरीय गुनिजन गौरव महासंमेलन तसेच पुरस्कार वितरण सोहळा नाशिक शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्रात राज्यस्तरावर विविध क्षेत्रातून पुरस्कारासाठी निवडलेल्या ५१ मानकरांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महा वस्त्र, गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले. ” मानवी मूल्यांचे जतन करणे हे आधुनिक जगापुढील फार मोठे आव्हान आहे! पुरस्कार मानकरी गुणीजनांनी त्यांच्या कार्याच्या सर्व क्षेत्रात माननीय मूल्य जतनाची चळवळ उभी करावी!” असे आव्हान समारंभाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक श्री रमेश आव्हाड यांनी पुरस्कार मानकरी गुणीजनांना केले. सेवानिवृत्त सीआयडी अधिकारी श्री राजेंद्र गोसावी हे या पुरस्कार सोहळा संमेलनाला विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध क्षेत्रातील गुणवंत,किर्तीवंत,यशवंत व्यक्तिमत्त्वाचा शोध घेऊन त्यांच्या कार्याचा समारंभ पूर्वक गौरव करणे खूप अभिनंदनीय बाब आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
“पुरस्कार म्हणजे गुणवत्तेला दाखविलेला नैवेद्य होय त्यामुळे गुणवंत गुणीजनांचा सन्मान करताना संयोजक संस्थेला धन्यता वाटते!” असे गौरवपूर्ण उद्गार संस्थेचे संस्थापक ऍड कृष्णाजी जगदाळे यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, जातीय आणि धार्मिक विद्वेष पसरविणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात गुंजनांनी कंबर कसून उभे राहिले पाहिजे. एकात्म एक संघ समाजाच देशाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो त्यामुळे आपले सामाजिक एकजूट कायम ठेवा, असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकरांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. पुरस्कार सोहळ्याच्या समारोपात तमाम गुनिजन मानकऱ्यांनी राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली . वर्षी १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुनिजन संस्थेचा हा२४व्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता.
पुरस्कार प्रेरणा देतात , प्रेरणेने राष्ट्र मोठे होते या ब्रीदवाक्यावर कार्यरत ही संस्था राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि विदेश स्तरीय पुरस्कार उपक्रम आयोजित करीत असते.
वर्ष 2025 मध्ये मुंबई, पुणे आणि नाशिक येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळे, दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई येथे राष्ट्रस्तरीय पुरस्कार सोहळे नेपाळ,थायलंड आणि सिंगापूर येथे गुनिजन गौरव समारंभ आयोजित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ऍड कृष्णाजी जगदाळे यांनी समारोपात जाहीर केले.
Discussion about this post