
प्रतिनिधी निलेश सुर्वे हिंगोली ..
हिंगोली महाराष्ट्र राज्यातील पत्रकारासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी मागणी आमदार, हेमंत पाटील यांनी नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेसनात विशेष उल्लेखद्वारे केली आहे.ही मागणी पुढील कार्यवाही साठी सभागृहाणे सामान्य प्रसाशन विभागाकडे पाठविलेले आहे. आपल्या राज्यामध्ये साध्यस्थीत्तीमध्ये 140 पेक्षा जास्त पत्रकार संगठना कार्यरत आहेत. पण त्यानां काम करतेवेळी मर्यादा येतात.. आजच्या स्थिती मध्ये लाखो पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया प्रत्येक्षात काम करत आहेत. त्याच बरोबर नवीन पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे व ती दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याच्या सोबतच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न खूप महत्वाचा आहे.पत्रकार सुद्धा समाजचा एक महत्वाचा घटक आहे. पत्रकारांना स्वतःच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.. व आपल्या हक्कासाठी झगडावे लागत आहे.त्यासाठी त्यांना स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांना न्याय मिळवून द्या अशी मागणी त्यांनी केली. कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी पत्रकारांना दिले..
Discussion about this post