
महसूल प्रशासनाणे घेतले झोपेचे सोंग..
प्रशासन जागे होणार की आंदोलनाने,मोर्चाने जागे करावे लागणार..
कुणाच्या दबावाने कारवाई ला ब्रेक..
महसूल प्रशासनाचा अर्थपूर्ण कानाडोळा की, कुणाचे दबावतंत्र..?
भडगाव प्रतिनिधी..
भडगाव बस स्टँड मधील काँग्रेटी करणाचे काम चालू आहे. हे काम दर्जादर आहे की निकृष्ट आहे ? हा गंभिर प्रश्र्न असताना या ठिकाणी 150 ते 200 ब्रास वाळू चा थप्पा पडलेला आहे त्यावर महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष का ? हि वाळू वैध आहे की अवैध ?? यावर कारवाई का नाही ? पंचनामे का नाही ? की अगोदरच सेटिंग झाले आहे. की कोणाच्या दबावाखाली आपले अधिकार दाबले जात आहे ? असे अनेक प्रस्न बस स्टँड परीसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला पडत असून या परीसरात चर्चेचा विषय बनला आहे.सर्व साधारण माणूस जर घर बांधत असेल तर त्याच्या कामावर एक ट्रॅक्टर जरी वाळू पडलेली असेल तर त्या घर मालकाला लगेच नोटीस, पंचनामे हे महसूल प्रशासन करते व गोरगरिबांना दहा पट दंड हे महसूल प्रशासन लादते.
आणि गरीब मोलमजुरी करणारा माणूस हा घाबरून दंड भरतो मग या बस स्टँड मध्ये पडलेली वाळू हि कोणत्या नियमाने पडली. महसूल प्रशासन हे कोणाला कोणाला अंगाशी तर कोणाला… का घालत आहे?? हा मोठा गंभिर प्रश्र्न सध्या भडगावकराना पडलेला आहे…..
Discussion about this post