विहिरगांव प्रतिनिधी :- रजत चांदेकर

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहे हिवाळ्यात खूप थंडी असते सध्या तर गुलाबी थंडी आहे अशा या थंडीत बरीच मुले स्वेटर न घालता शाळेत येतात व थंडीमुळे कुड कुडतात ही बाब हेरून शाळेचे मुख्याध्यापक किरण देशमुख व शाळेतील शिक्षिका कुमारी स्वर्णमाला जोल्हे, कुमुद डाखोळे व सौ.सविता मालखेडे यांनी विद्यार्थ्यांना स्वेटर घेण्यासाठी चर्चा केली शाळेतील स्वर्णमाला जोल्हे मॅडम यांच्या पुढाकाराने मागील वर्षी पासून विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम सुरू आहे या बचत बँकेत विद्यार्थ्यांचे मागील वर्षी घेतलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे बक्षीसांची रक्कम जमा होती या रकमेतून शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर घेण्याचा निर्णय शाळेतील सर्व शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज भाऊ रडके व सर्व सदस्य यांनी घेतला शाळेतील विद्यार्थ्याकरिता नेव्ही ब्ल्यू कलरचे स्वेटर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. नेव्ही ब्ल्यू कलर चे स्वेटर आणून विद्यार्थ्यांना देण्यात आले आता सर्व विद्यार्थी दर शनिवारी सकाळी स्वेटर घालून शाळेत येतात त्यामुळे सर्व विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतात आणि सोबतच थंडीपासून बचाव सुद्धा झाला विद्यार्थ्यांना मिळालेल्या बक्षिसांच्या पैशांचा योग्य वापर केल्यामुळे पालकांनी आनंद व्यक्त केला. व शाळेतील सर्व शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे कौतुक सुद्धा केले
Discussion about this post