
अकोला प्रतिनिधि, गणेश वाडेकर..
22/12/2024
तेल्हारा शहरातील जय भवानी चौक येथील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून ५८ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आली. देविदास सदाशिव पातोडे हे मुलाकडे पुण्याला गेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरातील लक्ष्मीची चांदीची मूर्ती, चांदीचा कर्दोळा, रोख ५५ हजार रुपये असा एकूण ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. पातोडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे..
Discussion about this post