प्रतिनिधी – साई विजय शहाणे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबना व सोमनाथ सुर्यवंशी या युवकाच्या मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोक सभेतील विरुद्ध पक्षनेते काँग्रेस चे नेते राहुल गांधी हे सोमवारी [ दि २३] दुपारी परभणी दौऱ्यावर दाखल होणार आहेत,नवी दिल्ली येथून राहुल गांधी हे विशेष विमान द्वारे सोमवारी दुपारी १ वाजता नांदेड ला दाखल होणार असून तेतून ते १.१५ वाजता वाहणा द्वारे दुपारी २.४५ वाजता परभणीत दाखल होणार आहेत.
नवा मोंढा येथील स्व. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या निवास स्थानी त्यांच्या कुटुंबियांची सांत्वणपर भेट घेणार , तेथून ३.३० वाजता ते नांदेड कडे प्रयाण करणार आहेत,नांदेडहून विशेष विमान द्वारे ५.१५ वाजता दिल्लीस रवाना होणार आहेत आशि माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष[ प्रशासन व संघटन] नाना गावंडे यांनी दिली.
Discussion about this post