
डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार सोहळा..
मानोरा प्रतिनिधी / विशाल मोरे..
मानोरा : भारतीय कृषक समाज, नवी दिल्ली संलग्न भारतीय कृषक समाज, महाराष्ट्र राज्य आयोजित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री आदरणीय डॉ. पंजाबराव देशमुख यांची १२६ वी जयंती उत्सव सोहळा दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे-नाशिक हायवे, ता. जुन्नर, जि. पुणे येथे आयोजन केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भारतीय कृषक समाज शेतकरी मेळावा तसेच कृषी व उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कारांसाठी भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य कमिटीने पुढील मान्यवरांची निवड केलेली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जलरत्न पुरस्कार डॉ. चंद्रकांत भोयर (नागपूर), कृषीरत्न पुरस्कार आकाशचंद्र मोतीसिंग गौरठाकुर (छ. संभाजीनगर), केशवराव गोपाळराव देशमुख (अकोला), मनिषा सुनिल पोटे (नाशिक), यज्ञेश वसंत सावे (पालघर) तसेच कृषीभूषण पुरस्कार बाळासाहेब बाबासाहेब पाटील (सांगली), दत्तात्रय बाबुराव घाडगे (सोलापूर), प्रा. रंगनाथ बाजीराव भापकर (अहिल्यानगर), मनोज जानरावजी जंवजाळ (नागपूर), विजय भानुदास मुळे (ता. खटाव, जि. सातारा) तसेच उद्योगभूषण पुरस्कार सपना पंकज तायडे (अमरावती), राधिका रुपेश घाटगे (शिरूर, घोडनदी), अनुराधा राहुल काशिद (भोर, पुणे), रुपाली शेषराव गायकवाड (बुलढाणा), संतोष देवराव गादे (नेवासा, जि. शिर्डी) या निवड झालेल्या मान्यवरांना कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येणार आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळ्यासाठी भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. कृष्णबीर चौधरी, नवीदिल्ली व प्रभारी ज्योती सुरसे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे, महिलाध्यक्षा स्वाती बोरीकर यांच्या उपस्थितीत हा जयंती, शेतकरी मेळावा व पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमात मा. मनोज मंत्री, संचालक गिन्नी ॲग्रो प्रो. लि. नागपुर, मा. लिंगराज पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष, भा.कृ.स. बेळगांव, मा. अनिल मेहेर कृषीरत्न व कार्याध्यक्ष ग्रामोन्नती मंडळ नारायणगांव, तसेच डॉ. प्रकाश सिंह रघुवंशी प्रगतशिल शेतकरी, वाराणसी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.
तसेच भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य यांनी ७ विभागांमध्ये जैविक ग्राम संकल्पना राबविण्याची ठरविली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम पुणे विभागाची निवड झाली असून पुणे विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील जैविक ग्राम कासारे, ता. पारनेर, जि. या गावाची निवड केली आहे.
या जयंती सोहळा व मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्यातून एफ.पी.ओ., डॉ. पंजाराव देशमुख सेंद्रीय शेती गट, शेतकरी, महिला बचत गट, उद्योजक, युवा व युवती शेतकरी समुहगट मोठ्या संख्येने येणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी उपस्थितीत राहण्याचे आवाहन भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलागे व प्रभारी ज्योती सुरसे व महिला अध्यक्ष स्वाती बोरीकर यांनी केले आहे.
ज्योती सुरसे प्रभारी, भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य
स्वाती बोरीकर महिला अध्यक्ष, भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्य
डॉ. सुभाष नलांगे अध्यक्ष, भारतीय कृषक समाज महाराष्ट्र राज्यया कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी विभागीय अध्यक्ष केशवराव देशमुख , वाशिम जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत गजाननराव देशमुख , जिल्हा महिला अध्यक्ष राधाताई मुरकुटे , मानोरा तालुका अध्यक्ष मिलिंद प्रकाशराव चव्हाण , मिडिया प्रतिनिधी विशाल मोरे यांनी केले आहे..
Discussion about this post