
नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथे श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिवस साजरा करण्यात आला.
या गणित दिवसानिमित्त शाळेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थ्यांनी साक्षी दीपक माळी,मयुरी अभय माळी, संजना अनिल माळी या विद्यार्थिनींनी गणितीय परिपाठ सादर केला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी हे होते व त्यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी भूमी महेश सोनार,जयश्री नवल माळी,खुषी भूषण माळी, रोशनी प्रवीण माळी, दुर्गेश्वरी विनोद भामरे,हर्षदा जितेंद्र माळी या विद्यार्थिनींनी गणितीय उखाणे सादर केले. त्यानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी मानवी सचिन गुरव,तनुजा अनिल माळी,कुंजन अरुण एंडाईत या विद्यार्थिनींनी भूमितीच्या दुनियेत हे गीत सादर केले. तसेच चैताली बिपिन माळी,नंदनी नंदकिशोर माळी,रोहिणी दिनेश माळी,रितिका विनोद भामरे,पूजा गणेश माळी या विद्यार्थिनींनी दोन आणि दोन चार हे गणितीय गीत सादर केले. त्यानंतर इयत्ता नववीचे विद्यार्थिनी जागृती भूषण माळी,तृप्ती मधुकर माळी,हर्षदा जितेंद्र माळी,तनुश्री प्रवीण सैंदाणे, भारती रवींद्र माळी या विद्यार्थिनींनी गणित दिवसानिमित्त नाचरे गणिता आमच्या मनात हे गणितीय गीत सादर केले.
या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक एस सी महाजन यांनी श्रीनिवास सामाजिक यांच्या जीवनाविषयी माहिती दिली त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात गणिताचा उपयोग कशा पद्धतीने होत असतो हे सांगितले.
या कार्यक्रमाच्या शेवटी गणित दिवसाचे औचित्य साधून गणितीय परीक्षा घेण्यात आली. या गणितीय परीक्षेमध्ये 120 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.माळी,शिक्षक एस.पी.एंडाईत,ए.डी.पाटील,बी.ए. माळी,एस.सी.महाजन,व्ही.डी.शिरसाठ,के.एल.ठाकरे.पी.सी.धनगर,व्ही.
आर.माळी,डी.डी.सोनवणे,जी.एस.कुवर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक एस.पी.एंडाईत यांनी केले. तर आभार एस.सी.महाजन यांनी मांडले..
Discussion about this post