प्रलंबित प्रकरणे मार्गी तातडीने मार्गी लावण्याची काँग्रेसची मागणीसंगमनेर दि. 24संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे.
मात्र मागील अनेक दिवसांपासून तयार करण्यात आलेली अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती तात्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार, वृद्ध व गोरगरीब, नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे याकरता निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गणेश मादास, नितीन अभंग, किशोर पवार, गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री, जालिंदर लहामगे, विजय उदावंत, दशरथ भुजबळ, रमेश नेहे, संजय कानवडे, सुभाष दिघे, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, किशोर बोऱ्हाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post