

वसमत प्रतिनिधी : सारथी महाराष्ट्राचा :
वसमत तालुक्यातील दगडगाव येथे होळीचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.होळी पेटवून त्यावरती खोबरं भाजून एकमेकांना वाटण्यात आले.
होळी म्हणजे हिंदू वर्षातील शेवटचा सण ! मराठवाड्यातील होळी ( शिमग्यासह) संपूर्ण देशभरात विविध प्रथांनुसार होळी हा सण साजरा केला जातो.
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये सर्व षड्रिपूंचे दहन होवो आणि सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी व समाधान नांदो, यावेळी गावातील नागरिक बाळ गोपाळ महिलांनी होळीचे पूजन करून अग्नी देऊन होळी पूजन करण्यात आले.
वसमत प्रतिनिधी सारथी महाराष्ट्राचा – संभाजी मुंजाळ..
Discussion about this post