चहा हे मुख्य पेय झाले आहेत व सर्वत्र लहान, मोठे चहाचे दुकाने शहरात, खेड्यात चौका चौकात मोठया प्रमाणात आहेतं. ग्राहक नागरीक मोठया प्रमाणात चवीने चहा पितात गरम गरम चहा हा कागदी कपात दिला जातो व त्या कागदी कपाचे आतील आवरणात प्लास्टिक आणि रसायनाचा वापर करुन डिस्पोजेबल कप तयार केले जातात.
गरम पेय टाकल्यामुळे आतील प्लास्टिक चे विघटन होउन त्याचे कण चहा व इतर गरम पेयात येतात व ते पेय पिणाऱ्यांच्या शरीरात जातात. यामुळे कागदी कपात चहा किंवा गरम पेय पिल्यास कर्करोग होऊ शकतो.
दीर्घकाळ या कपाचा वापर करत राहिले तर कर्करोग होऊ शकतो अशा बातम्या वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. तसेच बातम्यात डॉक्टर यांनी सांगितले की बीस्फेनॉल आणि BPA सारखी रसायने आढळतात ही अत्यंत घातक रसायने आहेत या कप मध्ये चहा किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील रसायने त्यामध्ये विरघळतात आणि ही रसाने पोटात पोहोचतात त्यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो.अशा बातम्या समाज माध्यमावर आहेत .
नुकताच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी सुध्दा चहा च्या कागदी कपावर बंदी घालण्याचा आदेश काढला व तो आदेश सोशल मीडियावर वाचण्यात आला.
आपण सुध्दा पुणे जिल्ह्यात कागदी कपावर बंदी आणून चहा चीनी माती, काचेचा ग्लास, मातीचा कप इ. मध्ये देण्याबाबत निर्णय घेऊन कॅन्सर सारख्या आजारापासून नागरिकांचे संरक्षण करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष श्री.गणेश जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ . सुहास दिवसे साहेब यांच्या कडे करण्यात आली आहे .
Discussion about this post