हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे नवनिर्वाचित लाडके आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्याचा प्रश्न पिक विमा प्रश्न ऊस उत्पादन शेतकऱ्याचा प्रश्न कारखानदार शेतकऱ्याची पिळवणूक करत असल्याचा
प्रश्न नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच साप चावून मृत्यु पावलेल्या शेतमजूर व शेतकऱ्याचा प्रश्न बेरोजगारी सिंचन वीज अदिसह अशा अनेक मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नाला आमदार कोहळीकर यांनी सभागृहात मुद्दे मांडून सभागृहाचे लक्ष वेधले आमदार बाबुराव कदम यांनी विधान भवन सभागृहांमध्ये धडाकेबाज एन्ट्री करून मतदारसंघातील नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडून सभागृहाचे लक्ष वेधले हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्वात जास्त आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणारे
एकमेव आमदार म्हणून बाबुराव कदम कोहळीकर यांचेच नाव सर्वप्रथम दिसून येत आहे हादगाव हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्याचे लक्ष वेधले असल्याने शेतकरी वर्गातून कोहळीकर यांचे कौतुक होत आहे शेतकऱ्याचा पिक विमा मिळावा यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन उपोषण रास्ता रोको केले परंतु त्यांची दखल कुणीच घेतली नाही व अतिवृष्टी अनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही
त्यामुळे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात पीक विमा व अतिवृष्टी अनुदान जमा करावे अशी मागणी कोहळीकर यांनी सभागृहात केली त्यामुळे तालुक्यासह महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहेत पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्याची बाजू मांडून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांमधून त्यांचे कौतुक होत आहे
Discussion about this post