परळी – तालुक्यातील अस्वलंबा येथील ऊसतोड मजूर विकास बाळासाहेब जोगदंड (वय २८) हा झोपेत असताना त्यांच्याच गावचा मुकादम श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७) याने डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याची घटना कर्नाटक राज्यात घडली.
घटप्रभा पोलिस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुकादम श्रीकृष्ण ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकास जोगदंड याने उपचारासाठी दवाखान्यात आणले होते. दवाखान्यात दाखल करून जोगदंड दवाखान्याबाहेर उभारण्यात आलेल्या जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूर्ती जवळ रात्री साडेअकराच्या सुमारास झोपला होता.
रात्री श्रीकृष्ण ढाकणे हा दवाखान्या बाहेर आला आणि काही कळायच्या आत विकास जोगदंडच्या डोक्यात चाळीस किलो पेक्षा मोठा दगड घातला. त्यानंतर विकासच्या छातीवर बसून दगडाने तोंड, डोके ठेचू लागला.
हे पाहून दवाखान्याच्या सुरक्षा रक्षकाने धाव घेत ढाकणे याला पकडले आणि घटप्रभा पोलिसांना माहिती दिली. ढाकणे याला पोलिसांच्या ताब्यात दिले. मृताचे वडील बालासाहेब मारुती जोगदंड यांनी घटप्रभा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
Discussion about this post