दशरथ दळवी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी चारोटी टोल नाका जवळ एक ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. गाडीच्या तांत्रिक बिघाडामुळे चालकाने ट्रक एम एच ०४ डी के १९८८ रस्त्याच्या कडेला उभा करून गाडी मालकाला माहिती दिली.
मालकाने तत्काळ मॅकॅनिक बोलावून गाडीतील बिघाड शोधण्याचा प्रयत्न केला.गाडी दुरुस्ती करत असताना, अचानक ट्रकने पेट घेतला.
काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. चालक आणि मालकाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
आगीमुळे ट्रक पूर्णतः जळून खाक झाला, ज्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.या घटनेने महामार्गावरील अग्निशमन दलाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
जर घटनास्थळी अग्निशमन दलाचे वाहन वेळेवर उपलब्ध झाले असते, तर अशा दुर्घटना टाळता आल्या असत्या आणि चालक-मालकांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले नसते.
महामार्गावरील अशा आपत्कालीन सेवा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.
Discussion about this post