मसाजोग तालुका केस जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या यांच्या पोलीस कोठडीत हत्याप्रकरणी आरोपीला कठोर शासन करणे बाबत मातृ तीर्थ सिंदखेडराजा येथील विद्यमान तहसीलदार साहेब अजित दिवट यांना निवेदन देण्यात आले.
मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिनांक 9 डिसेंबर रोजी अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या घटनेचा मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा तर्फे जाहीर निषेध करण्यात आले.
सदरीतील हत्या ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे.. ज्यामुळे समाजातील निरपराध लोकांचा बळी जात आहे. या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला नाही तर समाजाचा पोलीस यंत्रणेवरील व न्यायपालिकेवरचा विश्वास संपून जाईल,
तसेच परभणी येथील आंदोलन करते व संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या देखील पोलीस कोठडीत मृत्यू झाला या दोन्ही प्रकरणातील दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिजाऊ ब्रिगेड बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड बीड दक्षिण adv. उर्मिला हाडे. संत नामदेव तुकाराम परिषद महासचिव ज्योतीताई जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शारदा बावणे, जिल्हा कोषाध्यक्ष रंजना देशमुख, तालुका कोषाध्यक्ष सविता खांडेभराड, कोमल थोरात, सविता भोसले, राजेंद्र ठोसरे, बालाजी कळकुंबे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष मधुकर गव्हाड,Adv. गणेश कोकाटे, Adv. फारुख शेख,Adv. रामेश्वर मेहेत्रे, समाधान देशमुख, शिवाजी देशमुख, राजू भाऊ आढाव, अशोक निकस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post