प्रतिनिधी :- स्वप्नील पाटील
सातारा दि. 26 शहीद वीर जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर सातारा तालुक्यातील कामेरी येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद जवान शुभम घाडगे यांचे पार्थिव कामेरी गावी आल्यानंतर महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन , आ. मनोज घोरपडे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, गट विकास अधिकारी सतीश बुद्धे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश हंगे यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस व सैन्यदलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडुन आणि बंँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवुन मानवंदना दिली. यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे देण्यात आला वीरपत्नी अर्चना , मुलगी साईशा, आई मनिषा, वडील समाधान व भाऊ संजय यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर भाऊ संजय यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिली, यावेळी लष्कराचे विविध आजी माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Discussion about this post