रांजणगाव गणपती
प्रतिनिधी :बाळासाहेब कुंभार
अष्टविनायक तीर्थक्षेत्र व औद्योगिक नगरी असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती या ठिकाणी साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी यांच्यावतीने शिरूर तालुक्यातील यशस्वी उद्योजक सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात महागणपती देवस्थान दिवाणखाना हाॅल मध्ये देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष संदीप दौंडकर यांच्या अध्यक्षस्थानी पार पडला. या कार्यक्रमाला उद्घाटक व प्रमुख उपस्थितीत संस्थापक अध्यक्ष भूमाता ब्रिगेड सामाजिक कार्यकर्त्या तृप्तीताई देसाई,शिरूर तालुका अध्यक्ष मंगलाताई सासवडे,महाराष्ट्राची भूमी संपादक आनंदराव बारवकर,डाॅ ओंकार देव (देवस्थान ट्रस्ट मुख्य विश्वस्त),डी डी बारवकर (भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा सरचिटणीस), विवेकानंद फंड (सहसचिव द युवा ग्रामीण पत्रकार संघ),धनंजय गायकवाड (अखिल भारतीय ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष), तात्यासाहेब सोनावणे राॅ.काॅ.पुणे जिल्हा उपाध्यक्ष (शरद पवार गट),डॉक्टर सुजित शेलार राॅ.काॅ.शिरूर तालुका उपाध्यक्ष (अजित पवार गट),शिरुर आंबेगाव मनसे उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार, रमेश दौंडकर (डायरेक्टर स्वानंद फूड), प्रशांत देसाई, अनिल बत्ते, विलासराव शेळके, सुनिल खेडकर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात शिरूर तालुक्यातील शून्यातून विश्व निर्माण करणारे व एका व्यवसायातून यशस्वी पणे पाच मोबाईल शॉपी चे मालक होणारे यशस्वी उद्योजक मनेश खेडकर यांना मान्यवरांच्या हस्ते ” शिरूर तालुका यशस्वी उद्योजक पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले.मानाचा फेटा,प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.रांजणगाव व परिसरातून त्यांचे कौतुक करून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Discussion about this post