गुहागर प्रतिनिधी (नरेश मोरे) :
कोकणचे खेळे हा शब्द कानी पडतातच डोळ्यासमोर प्रतिमा उभी राहते ती आपल्या ग्रामदेवतेच्या जोगव्याची. कोकणच्या या लाल मातीतील ही लोकप्रिय लोक कला जिवंत ठेवण्याचे कार्य जर कोण करत असेल तर ती गावातील ग्रामस्थ त्यांचा वसा घेत आज कोकणातील नमन प्रेमी ही कला साथा समुद्रपलिके घेऊन जाण्याचे विडा उचळून ती आता पर्यंत जिवंत ठेवली आहे. कोकणच्या या नमन संस्कृतीला शासन दरबारी अजून तरी अनुदान मिळाले नाही ही आपल्या सर्वांसाठी शोकांतिका आहे.
असो. ग्रामदेवतेचा हा साज ( शिक्का,झगा) अंगावर परिधान करून आईला गाराण घालून आईचा हा जोगवा रंगभूमीरवर उभा राहतो मृदुंगावर थाप मारत ,पाहिलं नमन बोलत गायकीचा सुर धरत एंट्री होते ठेरया व कोळीणची (गोमूची) तेव्हा खेळाला रंग भरायला येतो कोकणचा नादखुळा संकासूर यांचा तो अनोखा दर्शनीय नाचकाम पाऊण डोळ्यात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि मृदुंगाच्या तालावर आपले पाय देखील नाचाचा ठेका धरायला प्रवृत्त होतात. हा खेळ अगदी निराळा त्याला तोड नाही कशाची तेव्हा या मंगळ क्षणी गणरायाचे स्वागत आरतीने करत विघ्न विनाशक हे मोरया करीते तुला रे आरती करत बाप्पा आशीर्वाद देऊन या कार्याचा श्री गणेशा करून निगून जातात मग नटेश्र्वर महाराज (नटवा) येतात विडा उचलतात आणि निघून जातात.त्या उगवत्या सूर्यदेवाच्या शीतल अशा किरणांचा सोनेरी प्रकाश पहाटेचा रंगबेरंगी नयनरम्य सुंदर असा देखावा कोंबड्यानी दिलेली ती बाग ,कोकिळाचा मंजुळ आवाज डोंगराआडून वाहणारी नदीचा तो खळखळाट गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी अशा या वातावरण अक्क नंदनवन कसं बहरून येत.
आनंदाने गोकुळ वाशी आपल्या रोजच्या आयुष्यात मग्न होत असतात तेवढ्यात कानी पडते ती नटखट अशा गोवर्धन गिरिधारी नंदकिशोर यांची ती मंजुळ स्वर वेणुचा मंत्रमुग्ध असा तो गोड आवाज कानी पडतात पूर्ण सृष्टी तल्लीन होऊन आनंदाने नाचू लागते. त्यात देवकी नंदन यांच्या मित्रांचा तो नादखुळा कारे सुदया हाका मारतो पेंद्या या बोबड्याला असे विचारत धर्ती मातेने परिधान केलेल्या या हिरव्या शालूत निसर्गाच्या या हिरवाइच्या खुशीत आपल्या गायी वासरांचा सांभाळ करत आपल्या किसन देवा सोबत यमुनेच्या काठी चेंडू फळीचा डाव मांडत असतात.
तेवढ्यात कानी पडतो तो पैंजणाचा छन छन असा आवज गोकुळीचा गौळणी आपला शुंगार करून सूर्य देवाला नमस्कार करून वाट धरतात . मथुरेची पहाटेच्या पारी ग कोंबड्याने दिली बाग , जाऊया चला सखयानो मथुरेच्या बाजारी करत. राधा तारा हिरा चंद्रा अशा सोहळा सहस्त्र तीनेशे आठ गोपिकांचा थाट माट करून मथुरेच्या बाजरी जायला निगतात. गोपिका निघाल्या मग मावशी कशी राहिल मागे बरी..?देवांची कामगिरी घेऊन संवगडी येतात आणि या गोकुळच्या नारीना परत माघारी पाठवतात. पण हे काम जेवढं वाटत तेवढं सोप्प नाही हो, धाव धाव चक्रपाणी…
गवळणी नाही आठपट हो , करत देव येऊन त्यांचा समाचार घेतात. हे ऐकताना वाचताना येवढं छान वाटत तर प्रत्यक्ष पहायला नक्कीच आवडेल ना? तर मंडळी वाट कसली पाहताय..कोकणच्या मातीतील अस्सल कोकणी बाज…कोकणची लोकप्रिय लोककला कोकणचे बहुरंगी बहुढंगी नमन.. अर्थात कोकणचे खेळे… श्री जय गणेश मित्र मंडळ आयोजित कोकण कट्टा निर्मित आम्ही कोकण कर प्रस्तुत कोकणचे नमन सोहळा पूर्वजांच्या पुण्याईचा आपल्या कोकण संस्कृतीचा दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे रात्री ८.१५ वाजता संपन्न होत आहे तरी आपण आपल्या परिवार सह उपस्थित राहून कोकणच्या सोहळ्याचे आनंद द्विग्नित करूया असे आवाहन लेखक/दिग्दर्शक कृष्णा येद्रे यांनी केलं आहे. अधिक माहिती भ्रमणध्वनी ९७७३१४२८१९ संपर्क साधावा.
Discussion about this post