प्रतिनिधी मुकुंद सुकटे
नेवरी येथील बी एल महाडीक विद्यालयाचे वतीने बाल आनंद बाजाराचे आयोजन बी एल महाडीक विद्यालयाचे प्रांगणात करण्यात आले होते. मुलांना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे, यासाठी आयोजित या उपक्रमात विद्यालयातील सुमारे १०० बाल व्यावसायिक सहभागी झाले होते. या आनंद बाजारात २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. या बाजारात पालकांसह ग्रामस्थांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. प्रारंभी स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा श्री वसंत महाडिक यांच्या हस्ते या आनंद बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा माने सर उप मुख्याध्यापक कडोले सर मंडले सर कुलकर्णी सर आंबी सर मंडले मॅडम साळुंखे मॅडम माने मॅडम सह सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग पालक ग्रामस्थ उपस्थित होते आनंदी बाजार यशस्वितेसाठी मुख्याध्यापक श्री माने सर यांचे मार्गदर्शनाखाली कडोले सर कुलकर्णी सर मंडले सर आंबी सर सौ मंडले मॅडम साळुंखे मॅडम माने मॅडम व सर्व सहशिक्षक यांनी परिश्रम घेतले. सर्व पालक वर्गाने आपल्या पाल्यांना विविध स्टॉल उपलब्ध करून प्रोत्साहन दिले.
या आनंद बाजारात शेतात पिकणाऱ्या पालेभाज्या, फळभाज्या, फळे, गावरान मेवा, चॉकलेट बिस्किट चहा, कॉफी, शीतपेये, वडापाव, पाणीपुरी, शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी, आदींची दुकाने थाटली होती.
चार भिंतींआड पुस्तकातील ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान मिळावे म्हणून शाळेच्या प्रांगणात १०० बालकांनी दुकाने मांडली. त्यावर स्वत:च्याच शेतातून आणलेल्या पालेभाज्या, फळे चॉकलेट गोळ्या शीतपे वडापाव विक्रीसाठी आणून ठेवली होती. या बाल आनंद बाजारात खरेदीसाठी पालकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती

Discussion about this post