सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
दिनांक – १३.०३.२०२५
दि.११मार्च २०२५ रोजी जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा उंदरगाव येथील शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे झाले. उंदरगावच्या प्रथम नागरिक श्रीम. रतनबाई माणिक लवटे व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रेश्मा ताई मोहन नाईकवाडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. गावचे उपसरपंच समाधान मारुती मस्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर कापसे यांनी सुरुवातीला प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे , समाजातील अनिष्ट प्रथा नष्ट करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
गणेश वंदना , स्वागत गीत,बालगीते, गवळण, लावणी, देशभक्तीपर गीते ,पोवाडा इत्यादी विविध प्रकारच्या गाण्यावर सदाबहार नृत्य करत विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तीन तासाच्या कार्यक्रमात आमचे सहकारी मित्र अनिल क्षीरसागर सर यांनी उत्कृष्टपणे निवेदन करून प्रेक्षकांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सलग सादरीकरण, अधून मधून बक्षिसांची रेलचेल , उत्कृष्ट नेपथ्य, रंगीबेरंगी स्टेज डेकोरेशन, आणि गावकऱ्यांचा प्रचंड उत्साह , बालकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट अशा वैशिष्ट्यपूर्ण वातावरणाने कार्यक्रमात रंगत आली.
बालकलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी आमदार अभिजीत आबा पाटील समर्थक ऋषिकेश तांबिले, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष बालाजी नाईकवाडे,आमचे मार्गदर्शक मुकुंद तांबिले सर, गणेश भोईटे सर, कुबोटा एजन्सी माढा येथील विक्रम भोईटे, रहस्य ऑईल माढा चे संस्थापक संदीप कापसे, युवराज लटके, मगन नाईकवाडे, संतोष माने, वैभव मस्के ,मोहन नाईकवाडे, सुधीर चव्हाण, सुभाष चव्हाण,पूजा आरे,शिवगंगा नाईकवाडे ,नमिता सुतार, प्रगती मस्के , माधुरी नाईकवाडे, राणी वाघमारे, कविता काटे , शितल मुजमुले, बचत गटाच्या महिला सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलाशिक्षिका कुमुदिनी गिड्डे मॅडम,बिपिन कदम सर ,धोंडीराम कांबळे सर,धनराज शिंदे सर यांनी खूप परिश्रम घेतले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post