- सोयगाव तहसील कार्यालय येथे संघटनेने दिले निवेदन
सोयगाव
तालुक्यातील सावळदबारा सर्वात शेवटचे टोक असलेले सावळदबारा या प्रमुख गावाला १४ ते १५ गावे जोडलेले आहेत. मुख्य बाजारपेठ असल्याने सावळदबारा येथील तलाठी कार्यालय सतत बंद राहते.त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली आहेत.तलाठी हे पंधरा दिवसातून एकदा हजेरी लावून गायब राहत असल्याची तक्रार अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती यांच्या तर्फे एका निवेदनाद्वारे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तर्फे करण्यात आली आहे.
सोयगाव तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार साबळे यांना नुकतेच हे निवेदन देण्यात आले आहे.
या वेळी संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गोकुळ सिंग राजपूत सोयगाव तालुका अध्यक्ष विजय काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप देशमुख सोयगाव तालुका उपाध्यक्ष सुनील चोरमले व सचिव भारत नप्ते या भ्रष्टाचार समिती संघटनेच्या वतीने नायब तहसीलदार सोयगाव काकासाहेब साबळे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.
या प्रकरणी अगोदर ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा तलाठी महोदय सतत गैरहजर असतात. तहसिलदार यांनी संबंधित तलाठी यांना कार्यालयात नेमून दिलेल्या दिवशी व वेळेवर उपस्थित राहण्याची सक्त ताकीद देण्यात यावी अन्यथा ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
फोटो ओळ :- सोयगाव – सावळदबारा येथील तलाठी सतत गैर हजर राहत असल्याची तक्रार करतांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे पदाधिकारी.
Discussion about this post