नामदार मेघना सामोरे बोर्डीकर व आमदार राजेश विटेकर यांचा 10 जानेवारी रोजी पाथरी येथे भव्य नागरी सत्कार
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
नामदार मेघना साकोरे बोर्डीकर व आमदार राजेश विटेकर यांचा नागरी सत्कार सोहळा पाथरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आला असून सत्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे नागरी सत्कार सोहळा समितीची दि 28 डिसेंबर रोजी विश्रामगृह पाथरी येथे बैठक झाली या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या बैठकीत ना मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या रूपाने खूप वर्षानंतर मंत्रीपद मिळाल्याबद्दल व आमदार राजेश विटेकर यांना विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल पाथरी तालुक्यातील राष्ट्रवादी भाजप, शिवसेनेच्या महायुतीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे हा सत्कार सोहळा दि 10 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात होणार आहे तत्पूर्वी सेलू कॉर्नर ते साईबाबा मार्गावरून जिल्हा परिषद पर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे
या नागरी सत्कार सोहळ्याला अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे माजी आमदार हरिभाऊ लहाने राहणार आहेत कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नागरिक सत्कार सोहळा समितीचे सर्वश्री अनिलराव नखाते, सौ भावना अनिलराव नखाते, दादासाहेब टेंगसे, संजय रनेर डॉ. उमेश देशमुख सुभाष आंबट संजय कुलकर्णी गोविंद गायकवाड बाळासाहेब कोल्हे गजानन धर्मे पांडुरंग नखाते विठ्ठल थोरात अशोकराव शिंदे सुशांत साळवे कृष्णा गिराम चंदू हरकळ भरत हरकळ गणेश दुकाने विजय कोल्हे यांनी केले आहे.
प्रति,
_————————————-+——————–
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.

Discussion about this post