
राहुरी तालुक्यातील सोनगाव हे राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची समजले जाते या सोनगाव ग्रामपंचायत मध्ये सध्या मनमानी कारभार सुरू असून गावाच्या विकासाकडे लक्ष न देता गावातील विकास कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जात असून ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे .गेल्या पंधरा दिवसापूर्वी अनापवाडी येथील अमरधाम मध्ये दिवस ढवळ्या झाडे तोडली गेली याबाबत ग्रामपंचायत ला निवेदन देऊन याबाबत विचारणा केली असता याबाबत कुठलीही परवानगी नाही तसेच झाडे तोडल्याबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही असे लेखी उत्तर ग्रामपंचायत ने ग्रामस्थांना दिले असून यावर माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे प्रणित परिवर्तन विकास मंडळाने तातडीने बैठक घेऊन याबाबत चर्चा केली असून मंडळाचे अध्यक्ष मिलिंद अनाप यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सूर्यभान शिंदे व बाकी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर वृक्षतोडबाबत सखोल चौकशी होऊन संबंधितावर ग्रामपंचायतने कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन द्यायचे ठरले असून सदे निवेदन ग्रामपंचायत मध्ये आज देण्यात येणार असल्याचे श्री अनाप यांनी सांगितले .सदर निवेदनामध्ये झालेल्या वृक्षतोडीबाबत काही कार्यवाही झाली किंव्हा नाही तसेच पंचनामा केला किंव्हा नाही याबाबत माहिती विचारली असून कार्यवाही केली नसल्यास संबंधितावर कार्यवाही कधी करणार याबाबत विचारणा करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले .निवेदनावर परिवर्तन विकास मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या सह्या असून ग्रामपंचायतने चार ते पाच दिवसात कार्यवाही केली नाही तर गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार असे तोंडी सांगून रीतसर कार्यवाही करण्याची मागणी सदर निवेदनात केली आहे. सदर निवेदनाच्या प्रती गटविकास अधिकारी राहुरी व तालुका वन अधिकारी राहुरी यांना पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
[ सोनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच व सदस्य झाडांची रोपे देऊन ग्रामस्थांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि विशेष म्हणजे याच पंचायतच्या मालकीच्या झाडांची दिवसा कत्तल केली जाते आणि पंधरा दिवस उलटूनही संबंधितांवर कार्यवाही होत नाही हे निंदनीय आहे – श्री.मिलिंद अनापअध्यक्ष परिवर्तन विकास मंडळ सोनगाव ] [अमरधाम मधील झालेल्या वृक्षतोडी बाबतच्या अर्जाचे ग्रामपंचायत मासिक मीटिंग मध्ये वाचन झाले त्यावेळीच मी कार्यवाही करावी म्हणून सांगितले होते परंतु मी विरोधक असल्याने माझे म्हणणं विचारात घेण्यात आले नाही तरी याबाबत भविष्यात आम्हा सदस्यांवर काही कार्यवाहीचा प्रश्न उपस्थित झाल्यास मी यासाठी जबाबदार नाही असे पत्र देणार आहे. महेंद्र अनाप – सोनगाव ग्रामपंचायत सदस्य ]..
Discussion about this post