
वाचन संकल्प महाराष्ट्राचा व्यापक उपक्रम
वडवणी प्रतिनिधी छत्रपती शाहू महाराज सार्वजनिक वाचनालय पिंपरखेड येथे २९ डिसेंबर ते २६ जानेवारी पर्यंत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ पिंपरखेड गाव आणि परिसरातील वाचक प्रेमींनी घ्यावा असे आवाहन या ग्रंथालयाचे सचिव प्राध्यापक प्रकाश खळगे सर यांनी केले आहे. या वाचनालयात दिनांक २९ रोजी वाचनालय स्वच्छता राबविण्यात आली.

३० डिसेंबर ते १५ जानेवारी ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये १ जानेवारी रोजी विद्यार्थी /विद्यार्थिनी सामूहिक पुस्तक वाचन, विद्यार्थी वाचन संवाद, १६ जानेवारी रोजी पुस्तक परीक्षण /कथाकथन, २६ जानेवारी रोजी विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. अशा महत्त्वपूर्ण उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी गावातील वाचक प्रेमी विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग महिला वर्ग यांनी सदरील वाचनालयातील उपक्रमाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. आवाहन वाचनालयाच्या अध्यक्ष विशाखा खळगे, उपाध्यक्ष ऍड. दादासाहेब तांगडे, सचिव प्रकाश खळगे सर, ग्रंथपाल पल्लवी खळगे, सहाय्यक ग्रंथपाल सौ. शीलाताई सुखदेव उजगरे, सहकार्य श्रीमती अग्नि अण्णाभाऊ खळगे, उदय निवृत्ती खरात सर, शीतल खळगे ,आनंद खळगे यांनी केले.
Discussion about this post