प्रतिनिधी:- विजय मगर
शेवगाव तहसील कार्यालय येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या यांच्या वतीने तालुक्यातील दलित व आदिवासी समाजाची जमीन घर व जागा हडपण्याची पत्र चालू असून सरकारी कार्यालयाचे अभयाखाली काही धन दांडगे आदिवासी व दलित लोकांवर अत्याचार करून त्यांचा आवाज दाबत आहे बाबा सविस्तर शेवगाव भूमि अभिलेख कार्यालय येथील मोजनी कर्मचारी नंदकिशोर शेळके आव्हाने बुद्रुक येथील दलित समाजातील आशाबाई बबन शिंदे व त्यांच्या दोन बहिणी यांची जमीन गट नंबर 30/1 मधील क्षेत्र 0.88आर असताना त्यांच्या नावे 0.58 आर क्षेत्र असे खोटा नकाशा तयार करून कोर्टात सादर करून फसवणूक केली असून त्या कर्मचाऱ्याला निलंबित करावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने शेवगाव मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले यावेळी आर पी आय तालुकाध्यक्ष सतीश मगर,उपाध्यक्ष गौरव मगर, किरण मगर, निरंजन बोरुडे,प्रेमभाऊ अंधारे, संतोष पटवेकर, इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post