प्रतिनिधी प्रमोद शितोळे
भवानीनगर:(३१)सा.वा. इंदापूर तालुक्यातील सणसर येथे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त श्री छत्रपती हायस्कूल सणसर यांच्या व अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांच्या वतीने ग्राहक जनजागृती पंधरावडा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत अँड. तुषार झेंडे पाटील यांनी ग्राहकांनी कसे जागृत राहिल पाहिजे व आपण ग्राहक म्हणून कोणतेही वस्तू खरेदी करताना पक्की पावती घेणं महत्त्वाचे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले, एखाद्या ग्राहकाचे फसवणूक झाल्यास त्या वरती कोठे तक्रार करावी याबाबत मार्गदर्शन केले.जिल्हा सहसंघटक दिलावरजी तांबोळी, पुणे जिल्हा कृषी समिती प्रमुख किशोरजी भोईटे, इंदापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर इंदापूर तालुका सचिव शत्रुघन घाडगे, इंदापूर तालुका संघटक सचिन रणसिंग, आबासाहेब निंबाळकर सहसंघटक इंदापूर ,सौ. अर्चना सपकळ इंदापूर तालुका अध्यक्ष, नाजीया सय्यद सचिव, महेश सपकळ संघटक,दादासो भोंगळे,गणेश गुप्ते अध्यक्ष भवानीनगर ,मंगेश खरात सचिव भवानीनगरआदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Discussion about this post