भोकर (प्रतिनिधी)- राजकुमार पांचाळ 9657978196
साईबाबा प्रतिष्ठान भोकरच्या वतीने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून भोकर तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात योगदान असलेल्या कर्तबगार महिलांना सावित्रीबाई फ ले भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वा. संस्थेच्या प्रांगणात होणार आहे.
श्री साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच सावित्रीबाई जयंती दिनी सामाजिक राजकीय विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना शिक्षणाची सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बि. आर. कदम हे राहणार आहेत. नवनिर्वाचित खासदार प्रा. रविंद्र चव्हाण यांचाही नागरी सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार देण्यात येणाऱ्या महिलांची नावे श्रीमती अरुणाताई कपाटे, शेषाबाई बंबलवाड, साबेरा बेगम इनामदार, सौ. सुमन हिरे, सौ. रूखमीनबाई सिलेमाने, सौ. भारतबाई राव, सौ. शीवकांता पडोळे, सौ. भारतबाई राठोड, श्रीमती निर्मलाताई खडतर, श्रीमती उमा देवी तिवारी, सौ. आनंदीबाई घोडेकर, श्रीदेवी मारकवार, कु. डॉ. ऐश्वर्या कदम, सौ. जिजाबाई चारलवाड, श्रीमती भागनबाई वर्षे वार, कु. राणी जाधव, कु. पार्वती चव्हाण आदि १७ महिलांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी आ.ओम प्रकाश पोकर्णा, हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, अब्दुल सत्तार, सुरेशदादा गायकवाड, सौ. रेखा चव्हाण, तिरुपती (पपू) कोंढेकर, बालाजी गाडे, शिरीष गोरठेकर, बाळासाहेब पाटील रावनगावकर, सुभाष पाटील किन्हाळकर, बबन बारसे गोविंदबाबा गौड, तौसीफ इनामदार, सुभाष पा. कोळगावकर आदींची उपस्थिती राहणार असून कार्यक्रमाचा सर्वांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याध्यापक नरेश पाकलवार यांनी केले आहे.
Discussion about this post