
*वाल्मिक कराडला केज न्यायालयाने सुनावली 15 दिवसांची पोलीस कोठडी*केज – पुण्याहून वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी पथक मंगळवारी रात्री उशिरा साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केज शहरात दाखल झाले. केजच्या सरकारी रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
त्यानंतर केज पोलीस ठाण्यात सीआयडी पथकानं दाखल होत तांत्रिक गोष्टींची पूर्ण केल्या. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कराड यांना केज कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर वाल्मिक कराड यांस 15 दिवसांची (14 जानेवारी पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली.
Discussion about this post