मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : शहरात आयुर्वेद प्रॅक्टिस सोबत समाजसेवेमध्ये सतत अग्रेसर असणारे, असंख्य रुग्णांच्या शस्त्रक्रिया व इतर उपचार मोफत करून देण्यासाठी सतत धडपडणारे डॉ ललित हेडा यांना पुणे येथे निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटलच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ ललित हेडा यांनी सन २०१९ पासून आय आयएएस या आयुर्वेद शिक्षण संस्थेची स्थापना करून जवळपास ६००० भारतीय व १००० च्या वर विदेशातील आयुर्वेद डॉक्टरांना आयुर्वेद स्पेशालिटी प्रॅक्टिस साठी आपल्या संस्थेमार्फत प्रशिक्षित केले, त्यांच्या याच कार्यामुळे आज मानोऱ्याचे नाव देशपातळीवर गेले व त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना पुणे येथे ‘निर्विकार आयुर्वेद रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Discussion about this post