मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा: आप्पास्वामी महाविद्यालय शेंदुरजना आढाव येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे दत्तक ग्राम खांबाळा येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या शिबिरामध्ये
दिनांक २७ डिसेंबर रोजी शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेंदुरजना आढाव येथील
डॉ.अजय खडसे यांनी गावातील ५० स्त्री -पुरुष व रासेयो शिबिरार्थींची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आले. डॉ. खडसे यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्रोफेसर डॉ. मुंदे होते.
कार्यक्रमास रासेयो महिला कार्यक्रमाधिकारी डॉ . सुनिता मनवर प्रा.सतीश काळे, डॉ. वैशाली भिसे, अमोल काळे,दत्तात्रय सावंत, संदीप भगत, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन विकास पवार यांनी करून अभार मानले.
Discussion about this post