मुकुटबन…..आरसीसीपीएल खान कंपनीचा विरोधात मुकुटबन येथील शेतकरी दांपत्याने शेतीच्या गेट समोर 1 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.. कंपनीतून निघणाऱ्या कन्व्हर्ट बेल्ट मधून धुळ निघत असून ,ती धुळ शेतमालावर येत आहे. याबाबत अनेकदा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तोंडी आणि लेखी सांगूनही त्यांनी या समस्या कडे दुर्लक्ष केल्याने, अखेर शेवटी एक जानेवारीपासून संतोष गंगा रेड्डी देवंतवार व त्यांची पत्नी सुमन देवंतवार हे दाम्पत्य उपोषणाला बसले ,उपोषणाच्या पहिल्या दिवशी महसूल विभागाच्या तलाठ्याने भेट देऊन सविचारपूस केली धुळीमुळे अनेक त्रास होत असुन,पिकावरही अतोनात परीणाम होत आहे.कंपनीने धुळ आटोक्यात न आणल्यास दर वर्षी सहा लाख रूपया प्रमाने नुकसान भरपाई द्यावी किंवा बाजारभाव प्रमाणे शेती कंपनीने विकत घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.
Discussion about this post