
हवेली तालुका प्रतिनिधी..
खानापूर येथील श्रीनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेला या वर्षी २५ वर्ष पूर्ण होत आहेत. यनिमित्त पतसंस्थेच्या नवीन वर्षाचे कॅलेंडरचे प्रकाशन नुकतेच श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर खानापूर येथे करण्यात आले. संस्थेच्या दोन शाखा असून विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द ते पानशेत या भागात भागधारक आणि खातेदार आहेत. यांच्या विश्वासावर पतसंस्थेची आजपर्यंत वाटचाल सुरु आहे. कॅलेंडर प्रकाशन प्रसंगी अध्यक्ष नामदेव शेठ जावळकर, नारायण शेठ जावळकर, श्रीनाथ भक्त वसंत जावळकर, विनायक जावळकर, शंकर जावळकर, तानाजी जावळकर, रामदास जावळकर, संजय थोपटे, नंदुशेठ जावळकर, गोपीनाथ जावळकर, सुरेश जावळकर,केशव जावळकर,मधुकर जावळकर एकनाथ जावळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर जावळकर, संतोष जावळकर, चंद्रकांत यादव, लक्ष्मण जावळकर, किसन जावळकर, गणेश जावळकर, अनंता वाघ, मारुती जावळकर, रामदास जावळकर हे उपस्थित होते. पतसंस्थेचे संस्थापक मा. पंचायत समिती सदस्य नितीन वाघ यांनी सर्व सभासद आणि खातेदार यांना नवीन वर्ष आणि रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या..
Discussion about this post