राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य यांची लाभणार हजेरी
वडवणी प्रतिनिधी
पवनपुत्र हनुमानाचे चिरंजीव असलेले मकरध्वज महाराज यांचे जगातील एकमेव मंदिर भारत देशात बीड जिल्ह्यातील वडवणी जवळील चिंचवण येथे आहे. अहिरावण महिरावण राक्षसाने याच ठिकाणी राम लक्ष्मणाला लपवून ठेवले होते आणि याच ठिकाणावरून हनुमंताने मकरध्वजासोबत युद्ध करून त्यांची सोडवणूक करून घेतली होती. रामायण काळातील मंकावती नगरी असलेले आजचे वडवणी तालुक्यातील चिंचवन या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य मकरध्वज जन्मोत्सव सोहळा येत्या पौष पौर्णिमेला साजरा होत आहे. या सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह होणार असून या सोहळ्यात राज्यातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, वादणाचार्यांची हजेरी लाभणार आहे. भाविकांसाठी हा एक सुंदर मेळावा असणार आहे. या सोहळ्याचा लाभ बीड जिल्ह्यातील भाविकांनी घ्यावा असे आवाहन चिंचवण गावकऱ्यांनी केले आहे.
रामायण ग्रंथामध्ये राम, लक्ष्मणाला अहिरावण महिरावण नावाचे राक्षस भुयारामध्ये घेऊन जातात. राम लक्ष्मणाचा शोध घेण्यासाठी हनुमान त्या भुयारात शिरतात. भुयाराच्या प्रवेशद्वारावर हनुमंत आणि त्यांचा मुलगा मकरध्वज यांचे घनघोर युद्ध होतं. युद्धामध्ये चर्चा केल्यानंतर पिता-पुत्र असल्याचा परिचय होतो. त्यानंतर हनुमान अहिरावण महिरावणाचा वध करतात आणि राम लक्ष्मणाची सोडवणूक करतात. रामायण काळातील ती मंकावती नगरी म्हणजे आजचे बीड जिल्ह्यातील वडवणी जवळील चिंचवन नगरी होय. याच ठिकाणी देवी मंकावतीचे मंदिर आहे. आणि जगातील एकमेव मकरध्वजाचे मंदिर देखील या चिंचवन नगरीत आहे. संत भगवान बाबांनी या ठिकाणी धार्मिक उत्सव सुरू केला. भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि मकरध्वज जन्मोत्सव सोहळा तेव्हापासून सुरू आहे .आज या सोहळ्याला ६४ वर्ष पूर्ण होत आहेत. संत भगवान बाबा नंतर भीमसेन बाबा यांनी देखील या सोहळ्यामध्ये हजेरी लावली गावकरी मोठ्या आनंदान हा सोहळा साजरा करतात .दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक ६ जानेवारी ते १३ जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सहा जानेवारी रोजी श्री क्षेत्र चाकरवाडी येथील तपोनिधी महादेव महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात होणार आहे .या सोहळ्यात गाथा भजन नेतृत्व पुरुषोत्तम महाराज कोठुळे तर ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व जीवन महाराज तांबडे हे करणार आहेत. या सोहळ्यात राज्यातील नामवंत कीर्तनकाराची कीर्तने प्रवचने गायन वादन होणार आहे. या सोहळ्यासाठी सर्व गावकरी आपापले कामे सोडून सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. बीड जिल्हा आणि राज्यभरातील भाविकांनी येत्या पौष पौर्णिमेला या ठिकाणी उपस्थित राहावे तसेच आठ दिवस कीर्तन आणि प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवण गावकऱ्यांनी केले आहे.
चौकट
या महाराजांचे होणार कीर्तने
मकरध्वज जन्मोत्सव सोहळ्यात दिनांक ६ जानेवारी ते 1२ जानेवारी दरम्यान रात्री आठ ते दहा या वेळेत ६ रोजी जेऊर येथील ह. भ. प. अक्षय महाराज उगले, ७ रोजी तुकोबाराय पावन धाम संस्था संभाजीनगर येथील ह. भ. प. महादेव महाराज बोराडे शास्त्री ८ रोजी परळी येथील हभप भरत महाराज जोगी ९ रोजी परळी येथील हभप तुकाराम महाराज मुंडे शास्त्री, १० रोजी टाकळी येथील ह भ प केशवराव महाराज घुले शास्त्री, ११ रोजी नाशिक येथील हभप अनिल महाराज तुपे, १२ रोजी सिद्धेश्वर महाराज संस्थान शिरूर कासार येथील ह भ प विवेकानंद महाराज शास्त्री तसेच १३ जानेवारी रोजी पौष्य पौर्णिमेनिमित्त या सप्ताहाचे काल्याचे किर्तन सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार व्याकरणाचार्य अर्जुन महाराज लाड यांचे होईल. दिनांक १४ जानेवारी रोजी संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ११:०० ते १:०० या वेळेत राज्यातील नामवंत कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज कोठुळे यांचे कीर्तन व त्यानंतर नंदकिशोर बाबासाहेब बडे पाटील व श्रीमंत संतराम बडे, पुरुषोत्तम भागवत तांबडे यांच्यातर्फे महाप्रसाद होणार आहे.
चौकट
प्रवचनकारांची नावे
दिनांक ६ ते १२ जानेवारी या कालावधीत दररोज दुपारी चार ते पाच या वेळेत अनुक्रमे ह भ प ज्ञानोबा माऊली, ह भ प हरिदास महाराज सोळंके गुरुजी मोहखेड, ह भ प लक्ष्मण महाराज बांगर कचरवाडी, ह भ प सुनील महाराज अंडील पहाडी पारगावकर, ह भ प शंकर महाराज शिंदे साबळेकर सेवानिवृत्त फौजदार, ह भ प आचार्य विठ्ठल महाराज शास्त्री श्रीक्षेत्र निळकंठेश्वर संस्थान वेदांत नगर, ह भ प रामेश्वर महाराज धपाटे परडी माटेगाव बीड जिल्हाध्यक्ष वारकरी साहित्य परिषद यांचे होणार आहे.
चौकट
गायनाचार्य, वादनाचार्य
या सोहळ्यात राज्यातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग महर्षी भरत महाराज पठाडे माजलगाव व श्री शंभो वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज खोटे सोनाखोटा, शिवश्री अभिमन्यू महाराज मुळे, मोहन महाराज सावंत, हरिदास महाराज पांचाळ, ज्ञानेश्वर महाराज, जगन्नाथ महाराज कराळे, सचिन महाराज थापडे, गोविंद महाराज चव्हाण, युवराज महाराज लवटे, अशोक महाराज कदम, विष्णू महाराज डोंगरे, रामेश्वर महाराज नानवर, कल्याण महाराज म्हात्रे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील नामवंत गायक जनार्दन स्वामी, रुस्तुम महाराज डाके, विष्णु महाराज शेंडगे, गोविंद महाराज व आनंद महाराज शेंडगे, कोठुळे बाप्पा तीगाव, विष्णु महाराज निपटे, अंगत महाराज डाके, सुग्रीव महाराज डाके, सुमंत महाराज डाके, अभिमान्यू महाराज पटेकर, सुनील महाराज अंडील, आबासाहेब महाराज जाधव, धोंडीराम महाराज फड, महादेव महाराज काळे, सिद्धेश्वर महाराज काळे, विष्णु महाराज लांडे, शिवाजी महाराज नांदे, सुभाष महाराज आजबे, बालासाहेब महाराज रसाळ, गणेश महाराज, नारायण महाराज वांडेकर, शंकर महाराज कोळपे, रमेश महाराज सावंत, विष्णू महाराज काळे, रावसाहेब महाराज आंधळे, काशिनाथ महाराज व रमेश महाराज शिनगारे, बाबुराव महाराज मायकर, तात्यासाहेब महाराज मस्के, भगवान महाराज शिंदे, पुंडलिक महाराज शिंदे, भागवत महाराज वरकड, महादेव महाराज खोटे, श्रीधर महाराज यादव, परमेश्वर महाराज डोरले, वसंत महाराज, प्रभाकर महाराज फावडे, विष्णु महाराज कोठुळे, पांडुरंग महाराज कोठुळे, तुकाराम महाराज, बाबासाहेब महाराज, वसुदेव महाराज, गोवर्धन महाराज, अखिल महाराज, शिवाजी महाराज, नाना देव महाराज, मदन देवा जोशी, आसाराम महाराज, विलास महाराज, रंगनाथ तोडताले, दशरथ महाराज, भीमराव महाराज, भरतरी महाराज, लिंबा महाराज म्हात्रे, पांडुरंग महाराज मात्रे, महादेव महाराज, विष्णु महाराज बापू म्हात्रे, धनंजय मात्रे, शिवलिंग शेटे, संदिपान नकाते, विश्वनाथ गिलबिले, जिवंन तांबडे, लक्ष्मण महाराज तांबडे, इंद्र मोहन महाराज वाकसे, सोपान महाराज रेपे, दत्ता रेपे, पांडुरंग नेटके, तुकाराम नानवर
चौकट
अन्नदानाचे यजमान
या सप्ताह सोहळ्यात सकाळचा नाश्ता सोपान दत्तू कोठुळे, अमृत वामन नांनवर, अंकुश नानवर, बाबासाहेब लिंबा कोठुळे, सोमनाथ एकनाथ म्हात्रे, बद्रीनाथ सोपान म्हात्रे, पांडुरंग रामनाथ म्हात्रे, भागवत सोपान मात्रे, मोतीराम सोपान म्हात्रे, बाबुराव देवराव ननवरे, नंदू धाम गोदाम हमाली मापाडी संघटना चिंचवन, धोंडीबा गिलबिले, विठ्ठल धोंडीबा गिलबिले यांचा नाश्ता राहणार आहे. तर दुपारचे अन्नदान ज्ञानोबा कारभारी कोठुळे, रंगनाथ सुखदेव बडे अण्णा, लिंबाजी निवृत्ती मात्रे, शहादेव भगवान म्हात्रे, राजेश नेटके सरपंच, प्राध्यापक सोमनाथराव निवृत्तीराव बडे पाटील व पंचदीप परिवार, रामा गणपतराव शिंदे, प्रल्हाद रामनाथ म्हात्रे, रामनाथ रघुनाथ बडे अण्णा, मेघराज रामहरी बडे, राधाकिशन संदिपान कोठुळे, अशोक भागवत कोठुळे, गणेश शिवाजीराव कोठुळे यांचे होणार आहे तर दररोजच्या संध्याकाळच्या पंगती मोहनराव ज्ञानोबा घुले नित्रुडकर, परमेश्वर रंगनाथ मात्रे, देवानंद दादाभाऊ तांबडे पोस्टमन, रमेश बाबासाहेब म्हात्रे, बापूराव निवृत्ती तांबडे, गोवर्धन निवृत्ती तांबडे, इंद्रेशन रंगनाथ कोठुळे आबा, विश्वनाथ सुंदरराव बडे अण्णा, बालाजी महिपतराव कोठुळे तात्या, राम साहेबराव मात्रे माजी सरपंच चिंचवन यांच्या पंगती होणार आहेत तर महाप्रसादाची सर्वात महत्त्वाची पंगत श्री किसन ज्ञानोबा दोडताले, वशिष्ठ सोपानराव लवटे यांच्यातर्फे होणार आहे.
Discussion about this post