रास्त भाव दुकानदाराचा मनमानी कारभार : कारवाईकडे लागले लक्ष
प्रवीण इंगळे — उमरखेड तालुका प्रतिनिधी
मो 7798767266
निंगनूर येथील बी के ठाकूर रास्त भाव दुकानदाराच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील अंत्योदय कार्डधारकांनी उमरखेड पुरवठा निरीक्षकाकडे तक्रार केली होती. तक्रारीची चौकशी करण्यात आली असून अहवाल वरिष्ठाकडे पाठवणार असल्याचे पुरवठा निरक्षक यांनी तक्रारकर त्यांना लेखी कळवले आहे. निंगनूर येथे बी के ठाकूर यांचे रास्त भाव दुकान आहे गोरगरिबांना अंत्योदय बीपीएल योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याची अफरातफर होत असून गरजू नागरिक शासनाच्या धान्य योजनेपासून वंचित राहत असल्याची लेखी तक्रार ओमप्रकाश घावस, बंडू टारपे, अशोक पोटे,श्रावण गंधारे, आदींनी उमरखेड पुरवठा निरीक्षकाकडे केली होती.
त्या तक्रारीवरून पुरवठा निरीक्षक अमोल महाजन यांनी तक्रारकर्ते व रास्त भाव दुकानदार यांना दि, 27 डिसेंबरला पूर्व सूचना देऊन जबाब नोंदवला व रास्त भाव दुकानातील अभिलेख,धान्यसाठा याची नोंद घेतली.
सविस्तर तपासणी अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पुढील कारवाईस्तव सादर करणार असल्याचे सांगितले कुठलाही गैरप्रकार आढल्यास संबंधिता विरुद्ध योग्य ती करावाई करणार असल्याचे पुरवठा निरीक्षण अमोल महाजन यांनी तक्रार दारांना कळवले आहे.

Discussion about this post