रस्त्याची चाळण .विकासाची वाट
प्रवीण इंगळे —- उमरखेड तालुका प्रतिनिधी मो 7798767266
उमरखेड : तालुका भरातील रस्त्याची अक्षरश : चाळण झाली असून सर्वत्र धुळीचे व खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे त्यामुळे शासन व प्रशासनिक उतरदायित्व नावाचा प्रकार नावालाही शिल्लक नसल्याचे दिसत आहे. जनतेला मात्र तोंड दाबून बुक्याचा मार सण करावा लागत असल्याने लोकांमध्ये कमालीची निराशा ओढवली गेली आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर येणाऱ्या विदर्भ मराठवाड्याच्या सीमावरती भागातील उमरखेड तालुक्याची दळणवळनाची व्यवस्था मोडकळीस असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे शहरातून जाणारा ढाणकी रस्ता हा तालुक्यातील प्रमुख वसाहती असलेल्या मतखंड ढाणकी फुलसांगी भागाला जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जाणारा मुख्य रस्ता आहे.मात्र या रस्त्याची अक्षरश : जागोजागी झालेली चाळण अतिशय चिंताजनक आहे. याबाबत असलेली शासन व प्रशासनाचे उदासीनता जनतेच्या डोळ्यात पाणी आणत आहे. एकंदरीत तालुक्याभरातील प्रमुख बाजारपेठा ते खेड्यापाड्यांची रस्त्याची झालेली दयनी अवस्था अतिशय चिंताजनक आहे. यासाठी शासनाकडून कोट्यावधीचा फंड ही आल्याचा वार्ता कानी पडत आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याच्या कॉलिटी वर त्या कोट्यावधीचा कुठलाही फरक पडताना दिसत नाही.

नागरिक विद्यार्थी यांना ये –जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे ही सर्व परिस्थिती उघड्या डोळ्यांनी जबाबदार शासन व प्रशासन मात्र डोळे बंद करून झोपेचे सोंग घेत आहे. का हा प्रश्न जनसामान्यांना व्याकुळ करणारा बनत चालला आहे. बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम या विभागातील अधिकाऱ्यांची संवेदनशीलता व बेजबाबदारपणा अजून किती काळ जनतेने सोसायचा हा ही यक्ष प्रश्न बनला आहे तसेच यावर अंकुश ठेवणारी व्यवस्था ही बोथड झाल्याची प्रचिती जनसामान्यांना येत आहे, याबाबत अनेक माध्यमांनी अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध करून सुद्धा यावर चोप लावणारे कनिष्ठ अधिकाऱ्यांपासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ते सर्वाचाच बेजबाबदारपणा जनतेला आणखी किती काळ सहन करावा लागत आहे हे बघावे आहे.
चौकटीत : अपघाताचे लागणार प्रमाण वाढले आहे तालुकाभरातील झालेल्या रस्त्याच्या दूरअवस्थेमुळे दररोज कुठून कुठेतरी छोटा मोठा अपघात घडून येत आहे.ये-जा करणारे वाहनधारक खड्डे चुकण्याचा प्रयत्न करताना दिसत असली तरी खड्ड्याच्या निर्माण झालेल्या शृंखलेमुळे आणि कोळी अपघाताला सामोरे जावे लागत आहे खड्ड्यामुळे पाठीच्या मणक्याचे आजार सोपवत आहे.च शिवाय धुळीमुळे शासनाचे आजार बळावत असल्याची धक्कादायक बाप समोर येताना दिसत आहे
Discussion about this post