प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
स्व.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या करणाऱ्या क्रूरकर्म्यांना तातडीने अटक करून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी परभणीमध्ये सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मोर्चा सकाळी ११ वाजता नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पर्यंत निघणार आहे.
या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय तसेच मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील, आमदार सुरेश आण्णा धस, खासदार बजरंग बप्पा सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.नरेंद्र पाटील,आमदार संदीप भैया शिरसागर, ज्योतीताई मेटे, व स्थानिक परभणी जिल्हा प्रतिनिधी खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत.
स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज सर्वपक्षीय, सर्व समाज आणि संघटनांची एकत्र बैठक घेण्यात आली बैठकीच्या सुरुवातीला सर्वांनी स्व.संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली.
बीड जिल्ह्यातील आपल्या बांधवाला न्याय देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी, दहशत व जातीयवाद मोडीत काढण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा सकाळी अकरा वाजता
नूतन महाविद्यालय जिंतूर रोड येथुन महाराणा प्रताप चौक -शनी मंदिर – नाना पेठ कॉर्नर- शिवाजी चौक- गांधी पार्क- नारायण चाळ मार्गे महात्मा फुले पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून या भव्य मोर्चाला सुरुवात होणार आहे.
या होणाऱ्या मुक महामोर्चासाठी परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व जाती-धर्मातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व पक्ष संघटना मित्र मंडळ सकल मराठा समाज यांच्या वतीने करण्यात आले आहे
प्रतिनिधी :- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post