
आरमोरी: डोंगरगाव भु. येथे दरवर्षीप्रमाणे ज्ञानज्योती युवती मंच, महिला बचत गट तथा ग्रामपंचायत डोंगरगाव भु. यांच्यावतीने ३ जानेवारी शुक्रवारला सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रथम सकाळी ७:३० वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पालखी सोहळा जिल्हा परिषद शाळा मधून संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. दुपारी १ वाजता सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा, सायंकाळी ४ वाजता विविध स्पर्धा कार्यक्रम व सायंकाळी ७ वाजता प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक श्री. कैलास गवते साहेब यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. भाग्यवानजी खोब्रागडे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून सौ. लक्ष्मीताई मने माजी जि. प. सदस्य, श्री. दिपक देवतळे गटशिक्षणाधिकारी, पं. स. आरमोरी, श्री. जयकुमार मेश्राम सर आरमोरी, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित सौ. संध्याताई येलेकर मॅडम गडचिरोली , श्री. डॉ. परशुराम खुणे साहेब गुरनोली, श्री. रामदास मसराम साहेब आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, कार्यक्रमाचे प्रबोधन मार्गदर्शक डॉ. एस एन पठाण सर माजी प्राचार्य वडसा, श्री. पुरुषोत्तमजी पाटील गडचिरोली, श्री. निखिल धार्मिक जिल्हाध्यक्ष प्रहार संघटना गडचिरोली, सौ. छायाताई खरकाटे सरपंच ग्रा.पं. डोंगरगाव भु. , श्री. लोमेशजी सहारे उपसरपंच, सौ वंदनाताई राऊत पोलीस पाटील, श्री. डंबाजी सामृतवार त. मु. स. अध्यक्ष इत्यादी मान्यवर उपस्थित राहतील.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Discussion about this post