केंद्रीय कृषी व ग्रामीण विकास मंत्री मा.ना.शिवराजसिंह चौहान जी यांनी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रास भेट देवून शेतकरी आणि बचत गटातील महीलांशी संवाद साधला.जिल्ह्यातील लखतपी दिदि आणि यशवंत शेतकर्याचा सन्मान त्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
कृषी केंद्राच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.माजी मंत्री मा.आण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील ,जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ, कुलगुरू डॉ प्रशांत पाटील, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.बचत गटांच्या स्टाॅलला मंत्री चौहान यांनी भेट दिली.शेतकऱ्याना ट्रक्टरचे वितरण करण्यात आले.
Discussion about this post